esakal | Live Video: ट्रकने ठोकरले दोन मोटारींना अन्..
sakal

बोलून बातमी शोधा

truck hit 2 cars road accident in pulwama video viral

जम्मू-काश्मीरमध्ये एका ट्रकने दोन मोटारींना ठोकारल्यानंतर झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Live Video: ट्रकने ठोकरले दोन मोटारींना अन्..

sakal_logo
By
वृत्तसंस्था

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये एका ट्रकने दोन मोटारींना ठोकारल्यानंतर झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Video: ...म्हणून भाजप आमदाराने चिखलात बसून वाजवला शंख

जम्मू-श्रीनगर महामार्गावर पंपोर परिसरात हा भीषण अपघात झाला आहे. प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकने बोलेरो आणि स्विफ्ट मोटारीला जोरात धडक दिली. धडकेनंतर मोटारीची दिशा बदलून गेली आणि ट्रकही रस्त्यावर उलटला. या ट्रकमध्ये असलेली खडी रस्त्यावर पसरली. अपघातात जखमी झालेल्यांना एसडीएच पंपोर इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन जणांचा मृत्यू झाला असून, ते अवंतीपुरा परिसरातील रहिवासी होते.

दरम्यान, अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, 2 जवान हुतात्मा; 3 जखमी