Video: ...म्हणून भाजप आमदाराने चिखलात बसून वाजवला शंख

वृत्तसंस्था
Friday, 14 August 2020

भारतीय जनता पक्षाचे मधोपूर येथील खासदार सुखबीर सिंग जौनापुरिया हे कोरोनापासून बचाव होण्यासाठी चिखलात बसून अंगाला चिखल लावला आणि शंख वाजवला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मधोपूर (राजस्थान): भारतीय जनता पक्षाचे मधोपूर येथील खासदार सुखबीर सिंग जौनापुरिया हे कोरोनापासून बचाव होण्यासाठी चिखलात बसून अंगाला चिखल लावला आणि शंख वाजवला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Video: कोरोना योद्ध्यांना कडक सॅल्यूट!

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनावर लस शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, जौनापुरिया यांनी कोरोनाला पळवून लावण्यासाठी चिखलात बसणे हा उत्तम उपाय असल्याचा दावा केला आहे. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सन प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जौनापुरिया हे चिखलात बसले आहेत. अंगाला चिखल लावून शंख वाजवत आहेत. त्यांनी कोरोनाला पळवून लावण्यासाठी व शरीराची प्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी हा उत्तम उपाय असल्याचा दावा केला आहे. यापूर्वीही 21 जून रोजी योगा दिना निमित्त शरीराला चिखल लावत योगा केला होता.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजपचे केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी 'भाभीजी पापड' खाल्याने प्रतिकारक क्षमता वाढते असा दावा केला होता. त्याआधी भोपाळचे भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी दररोज हनुमान चलिसा म्हणा व कोरोना पळवा असा सल्ला दिला होता. आता जौनापुरिया यांनीही चिखलात बसणे हा उत्तम उपाय असल्याचा दावा केला आहे.

केंद्रीय मंत्री म्हणतात; 'भाभीजी पापड' खा आणि कोरोनामुक्त व्हा...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp mp sukhbir singh jaunapuria claims mud pack for corona virus video viral