अमेरिकेतील मृत्यू १ लाखापर्यंत आटोक्यात आणले तरी...;ट्रम्प यांच्या वक्तव्याने खळबळ

Trump says keeping US Covid-19 deaths to 100000 would be a very good job
Trump says keeping US Covid-19 deaths to 100000 would be a very good job

न्यूयॉर्क : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये लॉक डाऊनची घोषणा करताना एक अजब वक्तव्य केले. जर आमच्या प्रशासनाने मृत्यांची संख्या 1 लाखांपर्यंत आटोक्यात आणली तर ते खूप चांगले काम असेल, असे त्यांनी वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांच्या वक्तव्याने सर्व चकित झाले आहेत. एवढेच नाही तर, याआधी त्यांनी लवकरच अर्थव्यवस्था पुन्हा सुरु करण्याची अपेक्षाही व्यक्त केली होती.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना व्हाययरसने जगभरात हाहाकार माजला असताना, अमेरिकेत परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होत आहे. चीनमधून आलेल्या या व्हायरसने देशाचे कंबरडे मोडले. अमेरिकेत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1 लाख 42 हजार 402 झाली आहे. तर, 2 हजार 497 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या अमेरिकेत कमी असली तरी, रुग्णांचा आकडा मात्र वाढता आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित केले आहे.

दिल्लीतील शाहीनबागमध्ये भीषण आग

दोन आठवड्यांत मृत्यू दर शिगेला पोहचण्याची शक्यता असून जूनपर्यंत अमेरिका पुन्हा पुर्वपदावर येण्यास सज्ज होईल, अशी माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. ट्रम्प यांनी प्रोजेक्शन मॉडेल्सचा हवाला देत, सामाजिक अंतर आणि इतर उपाययोजना न केल्यास 2.2 दशलक्ष किंवा त्याहून अधिक लोकांचा मृ्त्यू होईल. म्हणूनच, जर आपण हे सांगत राहिलो की 1 लाख ही एक भयानक संख्या आहे पण 20 लाख लोकांचा मृत्यू होण्यापेक्षा ती कमीच आहे, असे म्हटले आहे.

Coronavirus : एका दिवसात महाराष्ट्रातील आकडा १२ने वाढला; कोणत्या ठिकाणी किती वाढले रुग्ण

ट्रॅव्हल अॅडव्हायजरी लागू करणं हाही चांगला उपाय असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. राज्याच्या सीमा सील करण्याच्या ट्रम्प यांच्या वक्तव्यावर न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँड्र्यू कुओमो यांनी अवैध असल्याचं म्हटलं होतं. ट्रॅव्हल अॅडव्हायजरीनुसार तीन राज्यातील रहिवाशांना दोन आठवड्यापर्यंत कोणताही प्रवास करु नये असं आवाहन करण्यात आलं आहे. यादरम्यान, कुओमो यांनी न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या प्रायमरी इलेक्शनला एप्रिलऐवजी जूनमध्ये घेण्यात येतील असं सांगितलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com