आंध्रला विशेष राज्याचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार : सुरजेवाला

वृत्तसंस्था
रविवार, 22 जुलै 2018

देशातील अर्थव्यवस्था आणि औद्योगिक विकासावर यावेळी चिंता व्यक्त करण्यात आली. मात्र, हे सर्व प्रश्न ओळखून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.

नवी दिल्ली : आंध्रप्रदेश राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज (रविवार) सांगितले. काँग्रेस कार्यसमितीची (सीडब्ल्यूसी) बैठक आज दिल्लीत पार पडली. या बैठकीनंतर सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले.

'सीडब्ल्यूसी'ची ही बैठक पाच तास सुरु होती. या बैठकीला आजी-माजी मुख्यमंत्री, विविध राज्यातील प्रदेशाध्यक्ष उपस्थित होते. या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केल्याचे सुरजेवाला यांनी सांगितले. 

सुरजेवाला यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे : 

- राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली 2019 च्या लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजविण्यात आले. 

- काँग्रेस पक्ष शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्गीय लोकांसाठी काम करत आहे. 

- 'सीडब्ल्यूसी'च्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर लोकांच्या मनात पक्षाची पुन्हा उभारणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. यावर सीडब्ल्यूसी काम करेल. 

- देशातील विविध प्रश्नांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

- शेती क्षेत्रातील परिस्थिती, शेतकऱ्यांची आत्महत्या, तरुणांचे बेरोजगारीचे प्रमाण. या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. 

- देशातील अर्थव्यवस्था आणि औद्योगिक विकासावर यावेळी चिंता व्यक्त करण्यात आली. मात्र, हे सर्व प्रश्न ओळखून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.

- आदिवासी, दलित समाजातील घटकासाठी काँग्रेस व्यापक प्रयत्न करणार आहे.

- महिलांवर होणारे अत्याचार, गैरवर्तन यांसारखे प्रकार रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

- मोदी सरकारच्या अपयशावर काँग्रेसने चिंता व्यक्त केली. 

- आंध्रप्रदेश राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

- तसेच येत्या काही महिन्यात होणाऱ्या काही राज्यातील निवडणुकीबाबत रणनितीही आखण्यात आली. 

- आघाडीबाबत निर्णय हा काँग्रेस अध्यक्ष घेतील. 2019 ची लोकसभा निवडणूक कोणी एका व्यक्तीच्या विरोधात नसून, ती विचारसरणीच्या आधारित असणार आहे. 

Web Title: Trying to give special status to Andhra says Surjevala