पंचायतीचा तुघलकी फर्मान; आरोपीला उठा-बशा करून थूक चाटायला लावली

Accused was made to lick saliva
Accused was made to lick salivaAccused was made to lick saliva

महिलेचा विनयभंग (Molestation) केल्याच्या आरोपावरून पंचायतीच्या बैठकीत युवकाला पाच वेळा पाच वेळा उठा-बशा करून थूक चाटायला लावली. याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. पंचायतीच्या तुघलकी फर्मानचा चांगलाच निषेध होत आहे. ही प्रकार बिहारमधील लखीसराय जिल्ह्यातील बरहिया ब्लॉकमध्ये घडला. (Accused was made to lick saliva)

प्राप्त माहितीनुसार, बरहिया ब्लॉकच्या अजनीघाट पंचायतीच्या गावात शुक्रवारी रात्री उशिरा युवकाने महिलेच्या घरात प्रवेश केला आणि विनयभंग (Molestation) केला. महिलेने आरडाओरड केल्यानंतर युवक पळून गेला. मात्र, पळून जाताना तो लुंगी आणि टॉर्च तिथेच सोडून गेला. यानंतर महिलेने कुटुंबीयांना व गावकऱ्यांना याची माहिती दिली.

Accused was made to lick saliva
असा आहे शरद पवारांचा कार्यक्रम; नागपूरचे पोलिस आयुक्त म्हणाले...

घटनेची माहिती मिळाल्यानंतर सकाळी पंचायत बसली. पंचायतीमध्ये रात्रीच्या घटनेचा संदर्भ देत महिलेने आरोपीला शिक्षा देण्याची विनंती केली. यावेळी पंचायतीने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आरोपीला पाच वेळा कान पकडून उठा-बशा करण्यास सांगितले. तसेच थूक चाटायला (lick saliva) लावली. तसेच युवकाला महिलेला २५,०५१ रुपये दंड देण्यास सांगितले. अशी कोणतीही चूक केल्यास दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि शिक्षा म्हणून दंडही आकारला जाईल, असे पंचायतीने यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com