Erdogan advises Italy PM Giorgia Meloni to quit smoking
esakal
टर्कीचे राष्ट्रपती रेसेप ताय्यिप एर्दोगान सध्या जगातील नेत्यांना मद्य आणि स्मोकिंग सोडण्याचा सल्ला देत आहेत. हाच सल्ला त्यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनाही दिला आहे. मिस्रमधील शर्म अल शेख येथे गाजा शांतता कराराच्या बैठकीदरम्यान त्यांनी हा सल्ला दिला आहे. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. युरोपियन वृत्तपत्र 'पॉलिटिको'ने याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे.