मेंदूच माझा शत्रू असे लिहून वृत्तनिवेदिकेची आत्महत्या

वृत्तसंस्था
सोमवार, 2 एप्रिल 2018

हैदराबादमधील मुसास्पेट येथे राहत असलेल्या राधिका यांनी आपल्या राहत्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. राधिका यांच्या घरात पोलिसांना सुसाईड नोटही सापडली असून माझा मेंदूच माझा शत्रू आहे, असे त्यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले होते.

हैदराबाद : माझा मेंदूच माझा शत्रू असल्याची चिठ्ठी लिहून तेलगू वृत्तवाहिनीत वृत्तनिवेदिका म्हणून काम करणाऱ्या राधिका रेड्डी (वय ३६) हिने रविवारी रात्री पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. 

हैदराबादमधील मुसास्पेट येथे राहत असलेल्या राधिका यांनी आपल्या राहत्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. राधिका यांच्या घरात पोलिसांना सुसाईड नोटही सापडली असून माझा मेंदूच माझा शत्रू आहे, असे त्यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले होते.

राधिका रेड्डी या ‘चॅनल व्ही ६’ या तेलगू वृत्तवाहिनीत वृत्त निवेदिका म्हणून कार्यरत होत्या. कामावरून घरी परतल्यानंतर त्यांनी हे कृत्य केले. राधिका यांना १४ वर्षांचा मुलगा असून त्याला मानसिक आजाराने ग्रासले होते. सहा महिन्यांपूर्वीच राधिका यांचा घटस्फोट झाला आणि त्या आई-वडिलांच्या घरी परतल्या होत्या.
 
Web Title: TV Anchor Allegedly Commits Suicide In Hyderabad