'आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे 'राहुल गांधी', टीव्ही अँकरची जीभ घसरली (व्हिडिओ)

वृत्तसंस्था
Saturday, 21 September 2019

शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना 'शिवसेनेचे राहुल गांधी' म्हटल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबई : काही राजकीय नेत्यांकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'पप्पू' म्हणून खिल्ली उडवण्यात असते. त्यानंतर आता वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना 'शिवसेनेचे राहुल गांधी' म्हटल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'आज तक' या हिंदी वृत्तवाहिनीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची मुलाखत घेतली जात होती. मात्र, त्याचदरम्यान व्हिडिओ सुरु असताना 'मी बोलले फडणवीस यांची एक बाईट घ्या...हा शिवसेनेचा राहुल गांधी सिद्ध होईल लिहून घ्या', असा आवाज व्हिडिओ सुरु असताना आला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यानंतर आता #AnjanaOmKashyap यांना ट्रोल केले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TV Anchor Anjana Om Kashyap says Aditya Thackeray is Shivsenas Rahul Gandhi