मेकअप आर्टिस्ट अन् न्यूज अँकरचं होतं प्रेमप्रकरण; आड येणाऱ्या बायकोलाच...

वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

उत्तरप्रदेशातील इटावामधील मेकअप आर्टिस्ट आणि न्यूज अँकरचे प्रेमप्रकरण होते. या प्रकरणाच्या आड येणाऱ्या टीव्ही अँकरच्या पत्नीलाच या दोघांनी संपवल्याची घटना घडली आहे.

इटावा (उत्तर प्रदेश) : उत्तरप्रदेशातील इटावामधील मेकअप आर्टिस्ट आणि न्यूज अँकरचे प्रेमप्रकरण होते. या प्रकरणाच्या आड येणाऱ्या टीव्ही अँकरच्या पत्नीलाच या दोघांनी संपवल्याची घटना घडली आहे. इटावा पोलिसांनी या गुन्ह्याचा खुलासा केला आहे. एका न्यूज चॅनेलच्या अँकरसह तिघांना पत्नीच्या हत्येप्रकरणी तुरूंगात पाठवण्यात आलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, टीव्ही चॅनलच्या एका अँकरने सोबत काम करणाऱ्या महिलेबरोबर संबंध असल्यामुळे पत्नीची हत्या केली आहे.

अजितेश असे आरोपीचं नाव आहे. तर दिव्या असे त्याच्या मृत पत्नीचं नाव आहे. मृत दिव्याच्या मोबाइलने हत्येचे रहस्य उघड झालं आहे. ही हत्या अगदी जवळच्या एखाद्याने केली असल्याचा संशय सुरवातीला पोलिसांना होता.

पोलिस पहिल्या दिवसापासूनच त्या दिशेने तपास करत होते. 30 सप्टेंबर रोजी चॅनलमधून अजितेशने कामाचा राजीनामा दिला होता. या हत्येच्या कटामध्ये अजितेशसोबत त्याच्या चॅनेलमधील एक साथीदार अखिलेश सिंगही होता. अखिलेश सिंग मृतक दिव्याचा भाऊ म्हणून राहायचा. नोएडामध्ये राहत असताना दिव्यानेही त्याला राखी बांधली होती. सोमवारी अखिलेशने कटरा बालसिंग इथल्य़ा अजितेशच्या घरी दिव्याची हत्या केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TV anchor arrested for wifes murder in UP