...अन् सनी लिओनी आली ट्रेण्डमध्ये (व्हिडिओ)

sunny deol and sunny leone
sunny deol and sunny leone

नवी दिल्लीः अभिनेते सनी देओल हे पंजाबमधील गुरुदासपूर विधानसभा मतदार संघामधून निवडणूक लढवत असून प्राथमिक फेरीनुसार ते आघाडीवर आहेत. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने सनी देओल ऐवजी सनी लिओनीचा उल्लेख केल्यामुळे ट्विटरवर सनी लिओनी ट्रेण्डमध्ये आली.

रिपब्लिकचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी सनी देओल ऐवजी सनी लिओनीचा उल्लेख केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. व्हिडिओ व्हायरल होऊ लागल्यानंतर ट्विटरवर सनी लिओनी ट्रेण्डमध्ये आली. क्रिकेटपटू रविंद्र जडेजा यानेही ट्विट केले आहे. सनी लिओनी ट्रेण्डमध्ये आल्यानंतर तिचीही उत्सुकता वाढली. तिनेही तत्काळ ट्विट करत किती मतांनी आघाडीवर? असे ट्विट केले.

थोडक्यात, देशभरात लोकसभा निवडणूकीचा निकाल पाहण्यासाठी उत्सुकता असताना अचानक सनी लिओनी ट्रेण्डमध्ये आली. नेटिझन्सनही ट्विट करत काही काळ वातावरण हलके-फुलके केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com