केंद्राच्या सांगण्यावरून ट्विटरची नोटीस; कार्टूनिस्टने दिलं उत्तर

manjul
manjultwitter manjul
Summary

केंद्र सरकारकडून व्यंगचित्रकार मंजुलविरोधात ट्विटरकडे तक्रार करण्यात आली. ट्विटरने यानंतर व्यंगचित्रकार मंजुल यांना नोटीस पाठवली होती.

नवी दिल्ली - केंद्र सरकारकडून व्यंगचित्रकार मंजुलविरोधात ट्विटरकडे तक्रार करण्यात आली. ट्विटरने यानंतर व्यंगचित्रकार मंजुल यांना नोटीस पाठवली होती. केंद्राकडून मंजुलच्या कंटेंटला भारतीय कायद्याचे उल्लंघन असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, आता व्यंगचित्रकारावर केलेल्या आरोपानंतर आणि त्याच्याविरोधातील तक्रारीनंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावर मोदीविरोधी कमेंट येत आहेत. सरकार आता व्यंगचित्रकारांना टार्गेट करत असल्याचा आरोप होत आहे.

दरम्यान, प्रसिद्ध कार्टूनिस्ट तनेजा यांनी म्हटलं की, मंजुल यांनी नेहमीच थेट आणि प्रभावीपणे त्यांच्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. मंजुल यांना गप्प बसवण्यासाठी सरकार प्रयत्न करतंय त्यातून असंच दिसतं की सरकारला समस्या सोडवण्यामध्ये काहीच स्वारस्य नाही. त्याऐवजी फक्त प्रश्न विचारणाऱ्यांना गप्प बसवून प्रतिमा आहे तशी राखण्यात ते व्यग्र आहेत असंही वेबकॉमिक रचिता यांनी म्हटलं. तनेजा यांनी 2014 मध्ये वेबकॉमिक सुरु केलं होतं. यामध्ये सामाजिक, राजकीय समस्यांचा वेध घेतला जातो. तसंच लिंग, धर्म आणि संविधानिक अधिकार यांच्यावर भाष्य करण्यात येतं.

manjul
डॉक्टरांवर होणारे हल्ले, फेक न्यूज थांबवा; IMA चं PM मोदींना आणखी एक पत्र

मंजुल यांनी ट्विटरच्या मेलचा स्क्रीनशॉट शेअर करताना मोदी सरकारचा विजय असो असं उपहासाने म्हटलं आहे. तसंच मोदी सरकारचे आभार मानताना म्हटलं की, ट्विटर हँडल बंद करण्यास सांगितलं नाही याबद्दल मोदी सरकारचे आभार, हा कार्टूनिस्ट निधर्मी आहे, नास्तिक आहे आणि मोदीजींना तो देव मानत नाही असं काही म्हटले नाहीत हे बरं झालं. जर सरकारने म्हटलं असतं की, कोणत्या ट्विटमुळे अडचण झाली तर ते चांगलं झालं असतं. पुन्हा तसंच काम करता आलं असंत आणि लोकांनाही सोयीचं झालं असतं असा खोचक टोलाही लगावला आहे.

मंजुळ यांना अनेक व्यंगचित्रकारांना पाठिंबा दिला आहे. काही व्यंगचित्रकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कार्टून्स तयार करून मंजुळ यांना पाठिंबा दिला. तसंच मंजुळ यांनीही एक जुनं कार्टून शेअर केलं आहे. त्यात ट्विटर आणि मोदी सरकार यांच्यातील लढाई दाखवली आहे. त्यामध्ये पंतप्रधान मोदी ट्वि्टर, फेसबुकला त्यांच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दाखवलं आहे.

manjul
'जिथं मत तिथं लस', केजरीवाल यांची नवी मोहिम

मंजुल यांच्याप्रमाणेच सोशल मीडियावर क्रिएटिव्ह कार्टूनसाठी प्रसिद्ध असलेले सतिश आचार्य यांनीही केंद्र सरकारच्या या कृत्याची निंदा केली आहे. तसंच म्हटलं की, एक दिवस तुम्हालाही आमची गरज पडेल. कृपया व्यंगचित्रकारांना टार्गेट करणं बंद करा. व्यंगचित्रकार नेहमीच विरोधकांसोबत उभा राहतात. जेव्हा तुम्ही विरोधी पक्षाच्या भूमिकेत असणार आहात तेव्हा तुम्हाला यांचीच गरज पडेल.

आरजेडी खासदा मनोज कुमार झा यांनीही यावर ट्विट केलं आहे. यात त्यांनी हिटलरचं एक कार्टून शेअर करून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी या कार्टूनसोबत म्हटलं की, मंजुलच्या समर्थनात कोणत्याही कॅप्शनशिवाय....

manjul
कोरोना उपचारासाठी केंद्राच्या नव्या गाइडलाइन्स, अनेक औषधे केली बंद

काँग्रेस नेते शशी थरूर यांनीही सरकारवर यावरून टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की, मला आधी आशा होती की, हे कुणाचं तर कल्पोकल्पित असेल, उपहास असेल. मात्र नंतर हे खरं असल्याचं समजलं. माझा यावर विश्वास नाही तरी मी शेअर करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com