बनावट नोटा प्रकरणी बेळगावात दोघांना अटक

अमृत वेताळ
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

बेळगाव - बनावट नोटा खपविणाऱ्या आणि घेणाऱ्या दोघा संशयीताना अटक करुन त्यांच्याकडून 1 कोटी 81 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. आसीफ शेख (रा. वडगाव) आणि रफीक देसाई (रा. श्रीनगर) अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत. सोमवारी (ता.24) रात्री श्रीनगरनजिकच्या चन्नम्मा सोसायटीजवळ छापा टाकून वरील दोघांना पोलिसांनी रंगेहाथ पकडण्यात आले आहे. 

बेळगाव - बनावट नोटा खपविणाऱ्या आणि घेणाऱ्या दोघा संशयीताना पोलिसांना पकडले आहे. त्यांच्याकडून 1 कोटी 81 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. आसीफ शेख (रा. वडगाव) आणि रफीक देसाई (रा. श्रीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. सोमवारी (ता.24) रात्री श्रीनगरनजिकच्या चन्नम्मा सोसायटीजवळ छापा टाकून दोघांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. 

आसीफनामक तरुण बनावट नोटा एका व्यक्तीला पुरविणार आहे. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपायुक्‍त सीमा लाटकर, महानिंग नंदगावी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करुन काल रात्री या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. दोन हजार रुपयांचे 50 बंडल तसेच 500 रुपयांच्या नोटादेखील यावेळी जप्त करण्यात आल्या. मोठ्या प्रमाणात बनावट नोटा पकडण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: two arrested in fake currency case in Belgaum