
Two Arrested in Gujarat Temple Vandalism Case Including Temple Staff Member
Esakal
गुजरातच्या जुनागढ इथं श्री गुरु गोरक्षनाथ मंदिरात तोडफोड झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी आता गुन्हे शाखेनं तपास करत मोठा उलगडा केला आहे. गिरनार पर्वतावर असलेल्या मंदिरातली मूर्ती तोडून ती जंगलात फेकण्यात आल्याचा आरोप होता. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलं असून यापैकी एक जण मंदिरातच काम करत होता. शेकडो सीसीटीव्ही फूटेज तपासल्यानंतर आणि लोकांकडे चौकशी केल्यानंतर दोघांना ताब्यात घेतलंय. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये रमेश भट्ट आणि मंदिरात आधी काम केलेल्या एका स्थानिक फोटोग्राफरचा समावेश आहे.