Cheetah : दोन दिवसांमध्ये दोन चित्त्यांच्या पिल्लांचा मृत्यू; एकामागोमाग चित्त्यांचा मृत्यू का होत आहे?

Cheetah News
Cheetah Newsesakal

Madhya Pradesh : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नामिबिया आणि आफ्रिकेतून आणलेल्या काही चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. आता आज एका चित्त्याच्या पिलाचा मृत्यू झाला असून परवा एका पिलाचा मृत्यू झाला होता.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करुन दक्षिण आफ्रिकेतून भारतात २० चित्ते आणले होते. मात्र यातल्या तिसऱ्या चित्त्याचा मृत्यू 9 मे रोजी झाला होता. दक्षिण आफ्रिकेतून आणि नामिबियातून मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये मागच्या वर्षी २० चित्ते आणण्यात आलेले होते. मार्च आणि एप्रिल महिन्यात यातील दोन चित्ते मरण पावले. याच महिन्यात तिसऱ्या चित्त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Cheetah News
New Parliament Building: मायावतींनी मिळवला भाजपशी सूर, संसद उद्घाटन समारंभाला दिला पाठिंबा, हे आहे कारण

आता आज एका चित्त्याच्या पिलाचा मृ्त्यू झाला आहे. ज्वाला मादी चित्त्याच्या पिल्लाचा २३ मे रोजी मृत्यू झाला होता. आज दुसऱ्या पिल्लाचा मृत्यू झाला आहे.

Cheetah News
Mumbai House : मुंबईत फक्त अडीच लाखांमध्ये घर! महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने राज्य सरकारचा मोठा निर्णय

तिसऱ्या चित्त्याचा भांडणात झाला होता मृत्यू

९ मे रोजी झालेल्या घटनेत चित्त्यांना कुंपनाबाहेर सोडण्यात आलेलं होतं. मेटिंगदरम्यान दोन चित्त्यांचं भांडण झालं. त्यात एका चित्त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत पावलेल्या मादी चित्त्याचं नाव दक्षा असं होतं. कुना राष्ट्रीय उद्यानात आतापर्यंत तीन चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुनो नॅशनल पार्क प्रशासनात खळबळ उडाली. अधिकाऱ्यांना प्रथमच दोन चित्त्यांमधली झुंज पाहिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com