लग्नाच्या दोन दिवसांआधी नवरीला पेट्रोल ओतून जाळले; प्रियकराचे कृत्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Two days before the wedding, the bride was burnt with petrol

लग्नाच्या दोन दिवसांआधी नवरीला पेट्रोल ओतून जाळले; प्रियकराचे कृत्य

लग्नाच्या दोन दिवसांआधी २४ वर्षीय तरुणीवर (bride) पेट्रोल टाकून प्रियकराने जाळले. तरुणीला गंभीर अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ती जीवन व मृत्यूशी झुंज देत आहे. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुरुग्राममधील फारुखनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. वडिलांनी गावातील तरुणावर मुलीला जाळल्याचा आरोप केला आहे. घटनेपासून तरुण फरार आहे. (Two days before the wedding, the bride was burnt with petrol)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ मे रोजी मोठ्या मुलीचे लग्न (bride) होणार होते. सोमवारी पहाटे ५.३० वाजता मुलगी घरासमोरील प्लॉटमध्ये जनावरे चारण्यासाठी गेली होती. तिथे जयपाल ऊर्फ ​​बिल्लू याने मुलीवर पेट्रोल शिंपडून पेटवून दिले. आग (burn) लागताच मुलगी जोरजोरात ओरडू लागली. मुलीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात मुलगी जीवन व मृत्यूशी लढाई लढत आहे. हा तरुण अनेकदा मुलीचा छळ करीत असे, मुलीने सांगितल्याचे पोलिसांना वडिलांनी सांगितले.

हेही वाचा: वारांगनांसाठी नवा कायदा लागू; या देशाने दिली मान्यता

वडिलांच्या तक्रारीनंतर फारुखनगर पोलिस ठाण्यात कलम ३२६-ए (जाणूनबुजून ॲसिड टाकून गंभीर दुखापत करणे) आणि ३०७ (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी गावातील तरुणावर आरोप केला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असे फारुखनगर पोलिस ठाण्याचे प्रभारी सुनील कुमार यांनी सांगितले.

मुलीची प्रकृती चिंताजनक

जखमी मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, ती काहीही सांगण्याच्या स्थितीत नाही. तिची प्रकृती चिंताजनक आहे. आरोपीला लवकर अटक करण्यात येईल, असे पतौडीचे एसीपी हरिंदर कुमार यांनी सांगितले. पीडित मुलीचे वडील रोजंदारीवर काम करतात. त्यांना तीन मुले आहेत. त्यांच्या मोठ्या मुलीचे लग्न (bride) ११ मे रोजी होणार होते.

Web Title: Two Days Before The Wedding The Bride Was Burnt With Petrol

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :petrolbrideburn fat
go to top