आग्रा स्टेशनजवळ दोन स्फोट; जिवीतहानी नाही

वृत्तसंस्था
शनिवार, 18 मार्च 2017

आग्रा कॅन्टोन्मेंट रेल्वे स्टेशनजवळील कचरा कुंडीत एक आणि तेथून जवळच एका घराजवळ स्फोट झाल्याचे वृत्त आहे. या स्फोटामध्ये कुणीही जखमी झाले नसून बॉम्बशोधक पथक आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आग्रा - आग्रा स्टेशनजवळ आज (शनिवार) सकाळी दोन ठिकाणी कमी तिव्रतेचे दोन स्फोट झाले. या स्फोटात जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.

आग्रा कॅन्टोन्मेंट रेल्वे स्टेशनजवळील कचरा कुंडीत एक आणि तेथून जवळच एका घराजवळ स्फोट झाल्याचे वृत्त आहे. या स्फोटामध्ये कुणीही जखमी झाले नसून बॉम्बशोधक पथक आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

स्फोटानंतर शहरात अलर्ट घोषित करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. उत्तर प्रदेश लवकरच भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. त्यापूर्वीच ही स्फोटाची घटना घडली आहे. विशेष म्हणजे इसिस या दहशतवादी संघटनेने शुक्रवारी एका पोस्टरद्वारे ताजमहल उडवण्याची धमकी दिली आहे. त्यानंतर काही तासात हे स्फोट झाले आहेत.

Web Title: Two explosions in Agra. One in a garbage dumping tractor and the other on the terrace of a house