गुजराततेत दोन गटांत हाणामारी 

पीटीआय
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

अहमदाबाद (पीटीआय) : पिळदार मिशी ठेवल्याच्या कारणावरून एका दलित युवकास मारहाण केल्याच्या आरोपावरून कविठा गावात दोन गटांत हाणामारी झाली. ही घटना काल रात्री घडली असून, याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दिल्या आहेत. याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. रमणभाई मकवाना यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांचा भाचा विजय याला 31 जुलै रोजी सात जणांनी मारहाण केली. 

मारहाण करणारे राजपूत समुदायाचे असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यांनी विजयला पिळदार मिशा ठेवल्यावरून मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर ट्रकमधून आलेल्या लोकांनी मकवाना यांचा भाऊ विनूभाईल त्यांचा मुलगा विजय आणि संजय यांना मारहाण केली. तसेच दुसऱ्या तक्रारीत विजय याच्यासह काही जणांनी राठोड यांच्यावर हल्ला केल्याचे म्हटले आहे. 

Web Title: Two groups clash in Gujarat