लंडन : परराष्ट्र मंत्र्यांसोबतच्या शिष्टमंडळातील दोघांना कोरोनाची लागण

ब्रिटन दौऱ्यातील पुढील भेटीगाठी त्यांना व्हर्च्युअल पद्धतीनेच घ्याव्या लागणार आहेत.
Subrahmanyam-Jaishankar
Subrahmanyam-Jaishankar

लंडन : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jayshankar) यांच्याबरोबर लंडनमध्ये गेलेल्या शिष्टमंडळातील दोन जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग (corona infection) झाला आहे. यामुळे ब्रिटन दौऱ्यातील पुढील भेटीगाठी त्यांना व्हर्च्युअल (virtual) पद्धतीनेच घ्याव्या लागणार आहेत. तसेच, जी-७ गटाच्या परिषदेतही त्यांना याच पद्धतीने सहभाग नोंदवावा लागणार आहे.

Subrahmanyam-Jaishankar
"अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकल्यानं ऑक्सिजन मिळणार नाही" - सुप्रीम कोर्ट

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जगात सर्वत्र कोरोना नियमांचे काटेकोर पालन होते आहे. जयशंकर यांनी काल (ता. ४) अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती. मात्र, काल संध्याकाळीच शिष्टमंडळातील दोन जणांना संसर्ग झाल्याचे चाचणीनंतर स्पष्ट झाले. त्यामुळे काळजी म्हणून जयशंकर यांचे पुढील सर्व कार्यक्रम ऑनलाइनच होणार आहेत. जयशंकर हे आज ‘जी ७’ गटांच्या परराष्ट्र मंत्री पातळीवरील बैठकीला प्रत्यक्ष हजर न राहता, व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com