फोंडा येथे कार-ट्रकमधील अपघातात दोघे गंभीर जखमी 

विलास महाडिक 
रविवार, 3 जून 2018

अपघातात गाडीमधील गंभीर जखमी झालेल्यांची नावे डॉ. हेमाली देसाई व अभिजीत प्रभुगावकर अशी आहेत.

पणजी - कुर्टी - फोंडा येथे आज सकाळी कार व ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात गाडीतील दोघजण गंभीर जखमी झाली असून त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. त्यांची स्थिती गंभीर आहे. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. 

या अपघातात गाडीमधील गंभीर जखमी झालेल्यांची नावे डॉ. हेमाली देसाई व अभिजीत प्रभुगावकर अशी आहेत. ट्रकचा चालक बचावला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही वाहनांची समोरासमोर टक्कर झाल्याने  गाडीचा पूर्ण चेंदामेंदा झाला आहे.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Two injured in a car truck accident at Fonda Panji

टॅग्स