Jammu Kashmir:जम्मू-काश्मिरमध्ये दोन सैनिक पूरात वाहून गेले, ओसांडून वाहत असलेली नदी करत होते पार

Jawans Missing in Jammu-Kashmir: जम्मू-काश्मिरमधील पुंछ जिल्ह्यात भारतीय सेनेचे दोन जवान नदी ओलांडताना वाहून गेले. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
Jammu Kashmir:जम्मू-काश्मिरमध्ये दोन सैनिक पूरात वाहून गेले, ओसांडून वाहत असलेली नदी करत होते पार

Jammu-Kashmir Jawans Missing: जम्मू-काश्मिरमधील पुंछ जिल्ह्यात भारतीय सेनेचे दोन जवान नदी ओलांडताना वाहून गेले. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. यामधील एका जवानाची ओळख पटली असून त्याचे नाव नायब सुभेदार कुलदीप सिंह असे आहे. दुसऱ्या जवानाबद्दल माहिती मिळू शकली नाही.

भारतीय सेनेच्या १६ कॉर्प्सच्या कमांडिंग अधिकारी आणि जवानांनी कुलदीप सिंह यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. १६ कॉर्प्सच्या ट्विटर पेजवर लिहिण्यात आलयंकी व्हाईट नाईट कॉर्प्सचे कमांडिंग आणि सर्व रॅंक नायब सुभेदार कुलदीप सिंह यांच्या सर्वोच्च बलिदानाला सलाम करत आहोत.

अचानक आला पूर

माध्यंमांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता अधिकाऱ्यांनी सांगितले की पुंछ जिल्ह्यातील सुरानकोटेच्या पोशानामध्ये हे सैनिक डोगरा नाला ओलांडत होते, त्यावेळी जोरदार पावसामुळे अचानक आलेल्या पूरामुळे पाण्याचा प्रवाह जलद झाला आणि त्या प्रवाहात हे सैनिक वाहून गेले.

शनिवारी (दि. ८ जुलै) अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलिस आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन संयुक्त तुकड्या शोधकार्यात उतरलेल्या आहेत. मात्र, बेपत्ता सैनिकांबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही.(Latest Marathi news)

भारतीय सेनेचे अधिकारी आणि पोलिस वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि सुरु असलेल्या बचाव कार्याचा आढावा घेतला. अशातच, पोलिस वाहन जिल्ह्यातील विविध भागांतील लोकांना जोरदार पावसानंतर नदी-नाल्यांपासून लांब राहण्याचा सल्ला दिला आहे.

जम्मू- काश्मिरमध्ये जोरदार पाऊस

जम्मू-काश्मिरमध्ये सतत होणाऱ्या जोरदार पावसामुळे नद्या-नाले ओसांडून वाहत आहेत. खराब वातावरणामुळे शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी अमरनाथ यात्रा थांबवावी लागली. कोणत्याही यात्रेकरुला गुहेच्या दिशेने जाऊ दिले जात नाहीये. रामबन जिल्ह्यात २७० किलोमीटर लांब जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय राजमार्गावर बऱ्याच ठिकाणी भुस्खलन झाले. त्यामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com