चित्रीकरणादरम्यान दोन कन्नड कलाकारांचा मृत्यू?

वृत्तसंस्था
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

बंगळूर- 'मस्थीगुडी' या कन्नड चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोन कलाकारांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

बंगळूरपासून 35 कि.मी. अंतरावर असलेल्या तिप्पागोंदानहल्ली येथे आज (सोमवार) दुपारी चित्रीकरण सुरू होते. यावेळी हेलिकॉप्टरमधून पाण्यात उडी मारण्याचा स्टंट करत असताना दोन कलाकारांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

कलाकार पाण्यात पडल्यानंतर बोट तत्काळ पाठविण्यात आली आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर बचाव दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून कलाकारांचा शोध घेत आहेत.

Web Title: Two Kannada actors feared dead after jumping from copter during shooting near Bengaluru