काश्मीरमध्ये स्थानिकांकडून जवानांवर दगडफेक; 2 ठार

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 मार्च 2017

श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील बगडाम जिल्ह्यातील छादुरा भागात दहशतवादी व जवानांमध्ये आज (मंगळवार) सकाळपासून चकमक सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी जवानांवर दगडफेक केली, यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे.

पोलिस अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, छादुरा भागातील दरभाग येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. परिसरला जवानांनी चारही वेढा घालून शोध मोहिम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केल्यानंतर दोन्ही बाजूंनी चकमक सुरू झाली. दहशतवादी व जवानांमध्ये चकमक सुरू असतानाच स्थानिकांनी जवानांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलाने अश्रूधुराच्या नळकांडया फोडल्या व पेलेट गनचा वापर केला. यामध्ये 17 जखमी झाले असून, दोघांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, दहशतवादी व जवानांमध्ये अद्यापही चकमक सुरु आहे.

Web Title: two killed as gunbattle rages in J&K's Budgam