Video : पाकच्या दोन दहशतवाद्यांना पकडले अन् दिला चहा

वृत्तसंस्था
Wednesday, 4 September 2019

श्रीनगर : भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या पाकिस्तानच्या दोन दहशतवाद्यांना लष्कराने आज (बुधवार) जीवंत पकडले. लष्कराने त्यांना चहा दिला. चहा कसा आहे? असे विचारल्यानंतर त्यांनी चहा चांगला असल्याचे उत्तर दिले.

श्रीनगर : भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या पाकिस्तानच्या दोन दहशतवाद्यांना लष्कराने आज (बुधवार) जीवंत पकडले. लष्कराने त्यांना चहा दिला. चहा कसा आहे? असे विचारल्यानंतर त्यांनी चहा चांगला असल्याचे उत्तर दिले.

पाकिस्तानचे दोन्ही दहशतवादी लष्करे तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असून, चौकशी दरम्यान त्यांनी सांगितले. चौकशीदरम्यानचा व्हिडिओ काढण्यात आला आहे. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यापासून पाकिस्तान सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. पत्रकार परिषदेत बोलताना भारतीय लष्काराचे चिनार कॉर्प्सचे कमांडर जनरल केजेएस ढिल्लो म्हणाले, 'काश्मीर खोऱ्यातील शांतता भंग करण्यासाठी पाकिस्तान जास्तीत जास्त दहशतवाद्यांना भारतात घुसविण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय लष्कराने 21 ऑगस्ट रोजी दोन दहशतवाद्यांना पकडले आहे. पाकिस्तानमधील लष्करे तोयबाचे दहशतवादी असल्याचे त्यांनी सांगितले.'

एका दहशतवाद्याचे नाव मोहम्मद अजीम आहे. तो म्हणाला, 'पाकिस्तानच्या रावळपिंडीवरून आलो असून, लष्करे तोयबासाठी काम करतो. भारतीय लष्कराने त्यांना चहा दिला. त्यांना विचारण्यात आले की, चहा कसा आहे? त्यावर त्यांनी उत्तर दिले की, चहा चांगला आहे.' 'पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गाजी आबाद शहरातील रहिवाशी असल्याचे दुसऱया दहशतवाद्याने सांगितले.

दरम्यान, पाकिस्तानी F-16 विमानाचा पाठलाग करताना विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानने पकडले होते. अभिनंदन यांची चौकशी करताना पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याने चहा बाबत असाच प्रश्न विचारला होता. भारतीय लष्करानेही त्याच शिताफीने त्यांच्या स्टाइलमध्ये या दहशतवाद्यांना प्रश्न विचारले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two LeT terrorists arrested by Indian Army