esakal | काश्मीरमध्ये चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलाची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

काश्मीरमध्ये चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलाची कारवाई

काश्मीरमधील श्रीनगरमध्ये गुरुवारी रात्री उशिरा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.

काश्मीरमध्ये चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलाची कारवाई

sakal_logo
By
सूरज यादव

श्रीनगर - काश्मीरमधील श्रीनगरमध्ये गुरुवारी रात्री उशिरा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी सुरक्षा दलाने लष्कर ए तय्यबाच्या 2 स्थानिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. पोलिस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने श्रीनगरमध्ये शोध मोहिम सुरु केली होती. दोन्ही बाजूने जोरदार गोळीबार झाला. यात दोन दहशतवादी ठार झाले. अजुनही काही दहशतवादी लपून बसले असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

हेही वाचा: डेल्टा प्लस कमी फैलावणारा; ‘इन्साकॉग’चा दावा

याआधी 7 जुलै रोजी श्रीनगरमधील हंदवाडत झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी हिजबूल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर मेहराजुद्दीन हलवाई याचा खात्मा केला होता. मेहराजुद्दीन हा बऱ्याच काळापासून वाँटेड होता. अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये तो सहभागी होता.

जम्मू काश्मीरमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दल, भारतीय लष्कर, जम्मू पोलिसांनी दहशतवाद्यांविरोधात संयुक्त मोहिम उघडली आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत 200 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. यात सर्वाधिक हिजबुल मुदाहिद्दीन संघटनेच्या दहशतवाद्यांचा समावेश आहे.

loading image