Viral Video : केरळमधील मॉलमध्ये अभिनेत्रीशी गर्दीत गैरवर्तन; अभिनेत्रीने उगारला हात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : केरळमधील मॉलमध्ये अभिनेत्रीशी गर्दीत गैरवर्तन; अभिनेत्रीने उगारला हात

कोझिकोड (केरळ): प्रसिद्ध मल्याळम चित्रपट अभिनेत्री उत्तर केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील एका मॉलमध्ये आपल्या एका चित्रपटाच्या प्रमोशन कार्यक्रमासाठी गेली होती. मात्र यावेळी गर्दीत अभिनेत्रीसोबत गैरवर्तन झालं असून तिला लैंगिक छळाला सामोरं जावं लागलं. या संदर्भात तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा: सदावर्ते इज बॅक! भिख्खू संघाची केली थेट 'आरएसएस'ची तुलना; वाद निर्माण होण्याची शक्यता

आपल्या पोस्टमध्ये अभिनेत्रीने लैंगिक छळाबद्दल राग आणि चिंता व्यक्त केली. ती म्हणाली की, मंगळवारी रात्री एका मॉलमध्ये आयोजित कार्यक्रमादरम्यान मला लैगिक छळाला सामोरं जावं लागलं. याआधी एका अभिनेत्रीला असाच अनुभव आला होता, असही ती म्हणाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर आणि आणि स्थानिक टीव्ही चॅनल्सने प्रसारित केला आहे.

अभिनेत्रीने म्हटलं की, "कोझिकोड हे माझं आवडते ठिकाण आहे. पण, आज रात्री एका कार्यक्रमानंतर परतत असताना एका व्यक्तीने मला गर्दीत गलिच्छ हेतूने पकडले. आजूबाजूचे लोक इतके विचित्र झाले का? असा प्रश्न तिने विचारला आहे. चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने आपण अनेक ठिकाणी जातो. पण, इतका वाईट अनुभव मला इतर कुठेही आला नाही. माझ्या सहकाऱ्यांना देखील असाच अनुभव आल्याचं तिने सांगितलं.

दरम्यान या घटनेनंतर जमावाकडून लैंगिक छळ झालेल्या इतर अभिनेत्रींनीही त्यांचे वाईट अनुभव त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केले.

टॅग्स :Actors