दोन सापांमध्ये तुफान भांडण; व्हिडिओ व्हायरल

वृत्तसंस्था
शुक्रवार, 31 जुलै 2020

दोन सापांमध्ये भांडण होत असल्याचे अनेक व्हिडिओ आपण पाहात असतो. पण, एक तुफान भांडणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दोन साप चक्क पाण्यातून वर येऊन हवेत भांडण करताना दिसतात.

नवी दिल्ली: दोन सापांमध्ये भांडण होत असल्याचे अनेक व्हिडिओ आपण पाहात असतो. पण, एक तुफान भांडणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दोन साप चक्क पाण्यातून वर येऊन हवेत भांडण करताना दिसतात.

Video: अपघाताच्या व्हिडिओवर विश्वासच बसत नाही...

आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी सापांच्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. सुशांत नंदा हे विविध प्राण्यांचे व्हिडिओ व्हायरल करत असून, नेटिझन्स मोठा प्रतिसाद देतात. त्यांनी सापांचा व्हिडिओ ट्विट करताना म्हटले आहे की, 'रेट स्नेक वर्चस्वासाठी स्पर्धा करतात. इथं दोन नर साप त्यांचा प्रदेश परिभाषित करण्यासाठी आणि त्यांच्या साथीदारांच्या संरक्षणासाठी लढत आहेत'.  व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, 'पाण्यात दोन साप आपापसात भांडत आहेत. भांडता-भांडता दोघं रस्त्यावर येतात आणि तेथे भांडायला सुरुवात करतात. दोघेही एकमेकांवर हल्ले करण्यास सुरवात करतात. हे दोन्ही साप रेट स्नेक असल्याचे समजते.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two male snake fighting video viral