'न्यू ईयर'पार्टीवरुन घरी परतणाऱ्या २ मुलींवर बलात्कार, पोलिस असल्याची बतावणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rape Crime news

पोलिस अधिकारी असल्याचं सांगून दोन आदिवासी मुलींवर बलात्कार

नवीन वर्षाचा पहिला दिवस साजरा करून घरी परतत असताना ३५ वर्षीय नराधमाने दोन अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या मुली आदिवासी समाजातील (Tribal Community) आहेत. आंध्रप्रदेशातील वायझानगरम (Vizianagaram Andhra Pradesh) जिल्ह्यात ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

हेही वाचा: पत्नीच्या मदतीनं चर्चमधील फादरनं केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही पीडित मुली नवीन वर्षाचा पहिला दिवस साजरा करण्यासाठी शनिवारी मित्र-मैत्रिणींसोबत वट्टीगेड्डा जलायशावर सहलीसाठी गेल्या होत्या. सहलीवरून रात्री वसतिगृहात परतत असताना आरोपी रामबाबूने पोलिस अधिकारी असल्याचे सांगून धमकी दिली. त्याने दोन्ही मुलींवर बलात्कार केला. तसेच घडलेला प्रकार कोणालाही न सांगण्याची धमकी दिली. घडलेली घटना कोणाला सांगितल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देखील दिली. त्यानंतर मुलींनी कुटुंबीयांना माहिती दिली. तसेच पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. स्थानिक अधिकाऱ्यांचा जबाब आणि मुलींच्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही पीडित मुलींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच या आरोपीच्या विरोधात आतापर्यंत १३ तक्रारी दाखल झालेल्या आहेत, असं जिल्हा पोलिस अधिक्षक एम. दीपिका यांनी सांगितले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :crimeCrime Against Girl
loading image
go to top