esakal | दोन पाकिस्तानी सुना परतल्या भारतात; वाघा बॉर्डरवरुन झाली सासरी पाठवणी
sakal

बोलून बातमी शोधा

Wagha

भारत आणि पाकिस्तानमध्ये विरहात राहणाऱ्या दोन जोडप्यांची पुन्हा एकदा भेट झाली आहे.

दोन पाकिस्तानी सुना परतल्या भारतात; वाघा बॉर्डरवरुन झाली सासरी पाठवणी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : कालचा महिला दिन दोन जोडप्यांसाठी खास दिवस ठरला आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये विरहात राहणाऱ्या दोन जोडप्यांची पुन्हा एकदा भेट झाली आहे. पाकिस्तानात राहणाऱ्या दोन विवाहीत महिला राजस्थानातील बरमार या आपल्या सासरी वाघा-अटारी बॉर्डरच्या माध्यमातून परतल्या आहेत. महेंद्र सिंह यांची पत्नी छगन कंवर आणि नेपाळ सिंह यांची पत्नी कैलाशबाई यांना काल सोमवारी वाघा-अटारी बॉर्डरवरुन भारताकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी त्यांचे काही मोजके नातेवाईक देखील उपस्थित होते. यावेळी बॉर्डरवर त्यांच्या पतींकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. याबाबतचं वृत्त 'हिंदुस्तान टाइम्स'ने दिलं आहे.

बॉर्डर क्रॉस केल्यानंतर त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्णपणे तपासण्यात आलं तसेच त्यांची कोरोनाची देखील चाचणी करण्यात आली. नेपाळची पत्नी कैलाश तिच्या आई तसेच भावासोबत भारतात आली तर महेंद्रची पत्नी छगन कंवर तिच्या वडिलांसोबत यावेळी भारतात आली. नेपाळ सिंह यावेळी म्हणाले की, आपल्या पत्नीशी भेटून ते खूप आनंदी आहेत मात्र त्यांच्या लहान भावाच्या पत्नीला भारतात येण्यासाठी व्हिसा मिळाला नाही, याबाबत ते निराश आहेत. पुढे त्यांनी म्हटलं की, माझ्या पत्नीला व्हिसा मिळवून देण्यासाठी मदत करणाऱ्या केंद्रीय मंत्री कैलाश चौधरी यांचं मी आभार मानतो, ज्यांनी मला पदोपदी मदत केली. 

हेही वाचा - 88 व्या वर्षी का केली राजकारणात एंट्री? मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांनी स्वत:च केला खुलासा

पुढे त्यांनी म्हटलं की, सुरवातीला त्यांच्या पत्नीला फक्त हवाई मार्गेच येण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, त्यांना हवाई मार्गाद्वारे येणे परवडणारे नसल्याने त्यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या मदतीने वाघा बॉर्डरवरुन भारतात येण्यासाठी प्रयत्न केला. 27 वर्षीय नेपाळ सिंह भाटी आणि 25 वर्षीय विक्रम सिंह भाटी हे जैसलमेर जिल्ह्याचे रहिवासी आहेत. गेल्या जानेवारीमध्ये त्यांनी पाकिस्तानातील हिंदू कुटुंबातील मुलींशी लग्न केलं. लग्नानंतर ते दोघेही तीन महिने पाकिस्तानात राहिले. मात्र, त्यांच्या पत्नींना व्हिसा नाकारल्यानंतर ते दोघेही तसेच त्यांच्याशिवाय परतले होते. 

नेपाळ यांच्या प्रमाणेच महेंद्र यांनीदेखील एप्रिल 2017 मध्ये एका पाकिस्तानी मुलीशी लग्न केलं. मात्र, छगन यांचा व्हिसा नाकारल्यामुळे त्यांना वेगवेगळं रहावं लागलं होतं. त्यांच्या पत्नीचा व्हिसा नाकारल्यामुळे त्यांना देखील विरहात काही दिवस काढावे लागले होते.


 

loading image