पाकिस्तानच्या गोळीबारात जवानांसह दोन जण जखमी 

पीटीआय
शुक्रवार, 18 मे 2018

जम्मू- काश्‍मीरच्या सांबा आणि कथुआ जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात आणि तोफगोळ्यांच्या माऱ्यात सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसह दोन जण जखमी झाले. पाकिस्तानने सामान्य नागरिकांना लक्ष्य करीत आंतरराष्ट्रीय सीमेवरील 15 तपासणी नाक्‍यांना लक्ष्य केले होते, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. 
 

जम्मू - जम्मू- काश्‍मीरच्या सांबा आणि कथुआ जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात आणि तोफगोळ्यांच्या माऱ्यात सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसह दोन जण जखमी झाले. पाकिस्तानने सामान्य नागरिकांना लक्ष्य करीत आंतरराष्ट्रीय सीमेवरील 15 तपासणी नाक्‍यांना लक्ष्य केले होते, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. 

पाकिस्तानने सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर पहाटे दोनच्या सुमारास हा गोळीबार करण्यास सुरवात केली, तर कथुआमधील हिरानगर विभागात रात्री दहाच्या सुमारास गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा करण्यास सुरवात केली, असे सीमा सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी जोरदार प्रत्युत्तर देत गोळीबार करीत आहेत, असे या सूत्राने सांगितले. 

आंतरराष्ट्रीय सीमेपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळा या गोळीबारामुळे बंद करण्यात आल्या आहेत. सांबा आणि कथुआ जिल्ह्यात काल रात्रीपासून पाकिस्तानने शस्त्रसंधीचा भंग करीत आंतरराष्ट्रीय सीमेवर 10 ते 15 चौक्‍यांवर मोठ्या प्रमाणात गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा सुरू केला आहे. सीमा सुरक्षा दलाचे जवान त्याला जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. या गोळीबारात जखमी झालेल्या जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Web Title: Two people injured along with soldiers in Pakistan firing