
CM च्या सुरक्षेतील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना ड्रग्ज प्रकरणात अटक
बंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई (Basavaraj Bommai') यांच्या निवासस्थानी सुरक्षा रक्षक म्हणून ड्यूटी करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अमली पदार्थ तस्करी (Drug case) प्रकरणात बंगळुरु पोलिसांनी (Bengaluru Police) मंगळवारी अटक केलीय. शिवाकुमार आणि संतोष अशी अटक केलेल्या आरोपींची (culprit arrested) नावे आहेत. हे आरोपी अमली पदार्थ तस्करांकडून ड्रग्ज मिळवायचे आणि ग्राहकांना विक्री करायचे. असं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे.(Two police constables posted at Karnataka CM's residence arrested in drug crime)
हेही वाचा: मुंबई : नॅशनल पार्कमधील बिबट्याचा संशयास्पद मृत्यू
याबाबत सविस्तर वृत्त असं की, डंझो डिलिव्हरी अॅप्लीकेशनद्वारे पार्सलच्या साहय्याने आरोपी ड्रग्ज मिळवायचे. त्यानंतर कुणालाही या प्रकाराबाबत संशय येऊ नये यासाठी ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानच्या जवळच असलेल्या पत्त्यावर ड्रग्ज मागवायचे.
आरोपींचे ड्रग्ज तस्करांसोबत पैशांच्या व्यवहारामुळे वादविवाद होत असल्याने हे प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात सापडले. त्यानंतर पोलिसांनी या आरोपींना अटक केली असून त्यांच्याजवळ पोलिसांना गांजाचे पॅकेट सापडले आहेत.
Web Title: Two Police Constables Posted At Karnataka Cms Residence Arrested In Drug Crime
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..