दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन पोलिस हुतात्मा

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

इंफाळ (मणिपूर) - रस्त्यावरील गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या पथकावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवाद्यांनी अचानक केलेल्या हल्ल्यात दोन पोलिस कर्मचारी  हुतात्मा झाले आहेत. तर अन्य आठ जण जखमी झाले आहेत.

इंफाळ (मणिपूर) - रस्त्यावरील गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या पथकावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवाद्यांनी अचानक केलेल्या हल्ल्यात दोन पोलिस कर्मचारी  हुतात्मा झाले आहेत. तर अन्य आठ जण जखमी झाले आहेत.

भारत आणि म्यानमारच्या सीमेवरील मोरेह शहरापासून 21 किलोमीटर अंतरावर असलेल्या लोकचाओ येथे गस्तीवरील पोलिस पथकावर दहशतवाद्यांनी रात्री साडे आठ वाजता अचानक हल्ला केला. त्यामध्ये एक पोलिस कर्मचारी हुतात्मा झाले. तर अन्य आठ जण जखमी झाले. तर भोंगयांग येथे झालेल्या दुसऱ्या एका हल्ल्यात एक पोलिस कर्मचारी हुतात्मा झाले. तर अन्य काही जण जखमी झाले. मोहम्मद आयुब खान आणि एचसी नगारै मॅरिंग हे दोन कर्मचारी हुतात्मा झाले. जखमी झालेल्या आठ कर्मचाऱ्यांपैकी तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना इंफाळ येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

Web Title: Two police martyr in terror attack