हनुमान मंदिरात सांधूंची निर्घृण हत्या, दोघांना बांधून जिवंत जाळलं; मध्यरात्री दुहेरी हत्याकांड

Crime News उत्तर प्रदेशात शाहजहाँपूर इथं एका मंदिरात दोन साधूंची निर्घृण हत्या झाली आहे. आरोपीने दोन साधूंना मध्यरात्री बांधून ठेवत जिवंत जाळलं. आरोपी २ महिन्यांपूर्वीच तुरुंगातून सुटल्याचं सांगण्यात येतंय.
Sadhu Murder Case

Sadhu Murder Case

Esakal

Updated on: 

मंदिरात दोन साधूंना बांधून जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीय. उत्तर प्रदेशातील शाहजहांपुर जिल्ह्यातील खुदागंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुथा गावात दोन वृद्ध साधूंची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी रात्री हनुमान मंदिर परिसरात ही घटना घडली. गोपाल दास आणि बड़े दास अशी मृतांची ओळख पटली असून, बड़े दास हे दिव्यांग असल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com