Video: चिनी सैनिक सीमेवर जाताना ढसाढसा रडले

वृत्तसंस्था
Wednesday, 23 September 2020

भारत-चीन सीमेवर काही दिवसांपासून तणावाचे वातावरण सुरू आहे. भारतीय जवानांबरोबर झालेल्या धुमचक्रीत चीनच्या सैनिकांना जीव गमवावा लागला आहे. भारतीय जवानांची चीनच्या सैनिकांनी एवढी धास्ती घेतली आहे की सीमेवर जाताना ते अक्षरशः ढसाढसा रडत आहेत. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

बिजींग (चीन) : भारत-चीन सीमेवर काही दिवसांपासून तणावाचे वातावरण सुरू आहे. भारतीय जवानांबरोबर झालेल्या धुमचक्रीत चीनच्या सैनिकांना जीव गमवावा लागला आहे. भारतीय जवानांची चीनच्या सैनिकांनी एवढी धास्ती घेतली आहे की सीमेवर जाताना ते अक्षरशः ढसाढसा रडत आहेत. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Video: मृत मुलाच्या ह्रदयाचे ठोके ऐकून फुटला भावनांचा बांध

भारत-चीन सीमेवर भारतीय जवानांचा पराक्रम पाहून चिनी सैनिकांची घाबरगुंडी उडाली आहे. लडाख सीमेवर तैनात करण्यात आलेले चीनी सैनिक चक्क रडू लागल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तैवान न्यूजने म्हटले आहे की, 'चिनी सोशल मीडिया वीचॅटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. काही वेळानंतर तो हटवण्यात आला. सैनिक फूयांग रेल्वे स्टेशनवर जात असतानाचा हा व्हिडिओ आहे. चिनी सैन्यात दाखल झालेले हे जवान प्रशिक्षणानंतर लडाख सीमेकडे रवाना झाले आहेत. या व्हायरल व्हिडिओमध्ये चिनी सैनिक त्यांचे गाणं 'ग्रीन फ्लॉवर्स इन द आर्मी' गात असल्याचे दिसत आहे.'

दरम्यान, भारतीय लष्कराने एलएसी जवळच्या उंचावरच्या 6 नव्या टेकड्यांवर ताबा मिळवला आहे. लडाखच्या पूर्व भागातल्या या टेकड्या असून, उंचावर असल्याने चिनी लष्करावर अंकूश ठेवणे सोपे जाणार आहे. या टेकड्यांवर ताबा मिळविण्यासाठी चीनने हालचाली सुरू केल्या होत्या. पण, भारतीय लष्कराने तातडीने पावलं टाकत या टेकड्या ताब्यात घेतल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india china tension pla recruits started crying en route to ladakh border video viral