दक्षिण काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा

ठार झालेल्या दहशतवाद्यांची अद्यप ओळख पटलेली नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दहशतवाद्यांचा खात्मा
दहशतवाद्यांचा खात्मादहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर : दक्षिण काश्मीरमधील (South Kashmir) शोपियान जिल्ह्यातील जैनापोरा भागातील बडीगाममध्ये (Badigam) गुरुवारी सुरक्षा दल (Security Force) आणि दहशतवाद्यांमध्ये (Terrorist) चकमक झाली. यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांची अद्यप ओळख पटलेली नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Two Terrorist Killed In Jammu Kashmir Badigam Zainapora Area)

तर, दुसरीकडे चकमक स्थळाजवळ सुमो पलटी झाल्याने दोन जवानांना (Car Accident) प्राण गमवावे लागले, तर दोन जण जखमी झाले आहेत. सुमो 44 आरआर चौगाम कॅम्पमधून सैन्यासह बडीगाम येथे चकमकीच्या ठिकाणी जात होते. त्यावेळी वाटेत चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सुमो पलटी झाली. यात दोन जवानांचा मृत्यू झाला तर, दोघेजण जखमी झाले आहेत.

जखमी जवानांना शोपियांच्या जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी तीन दहशतवादी असल्याची प्राथमिक माहिती असून, दोघा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश मिळाले आहे. तर, तिसऱ्या दहशतवाद्याचा शोध घेतला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com