गुजरातचे दोन 'लबाड' लोकांना फसवत आहेत: भाजप नेते

गुजरातचे दोन 'लबाड' लोकांना फसवत आहेत: भाजप नेते

लखनौ- गुजरातचे दोन लबाड लोकांना फसवत आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य उत्तरप्रदेशातील एका भाजप नेत्याने केले आहे. त्यामुळे या नेत्यावर भाजपकडून कारवाईदेखिल करण्यात आली. भाजपचे माजी प्रवक्ते आयपी सिंह यांनी पक्षाचं नेतृत्व गुजरातचे भामटे करत असल्याचं म्हटले आहे. भाजपने प्रधानमंत्री निवडला आहे की प्रचारमंत्री अशीही टीकाही सिंह यांनी केली.

आयपी सिंह यांनी ट्विट करत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आझमगढ येथून निवडणूक लढवत असल्याबद्दल कौतूक केलं आहे, त्याचबरोबर प्रचारासाठी गरज असल्यास कार्यालय म्हणून आपल्या घराचा वापर करु शकता असेही सांगितले आहे. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याने आयपी सिंह यांना प्रदेशाध्यक्षांनी सहा वर्षांसाठी पक्षातून हाकलपट्टी केली आहे. आयपी सिंह यांनी केलेल्या ट्विट्सनंतर ही कारवाई कऱण्यात आली. महत्त्वाचं म्हणजे एकीकडे भाजपाचे सर्व नेते ट्विटरवर नावापुढे चौकीदार लिहित असताना आयपी सिंह यांनी उसूलदार असे लिहिलं आहे.

मी आदर्शवादी क्षत्रिय कुटुंबातील आहे. आपण शांत असताना गुजरातचे दोन भामटे गेल्या पाच वर्षांपासून हिंदी भाषिक लोकांची फसवणूक करत आहेत, असं आयपी सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. आमच्या उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था गुजरातपेक्षा सहा पटीने मोठी आहे. उत्तर प्रदेशचं आर्थिक उत्पन्न पाच लाख कोटी असून गुजरातचं फक्त एक लाख 15 हजार कोटी आहे, असं सांगताना आयपी सिंह यांनी अशा परिस्थितीत ते काय खाणार आणि काय विकास करणार अशी टीकाही केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com