समर्थनगरला समाजकंटकांनी पेटविल्या दुचाकी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

समर्थनगरला राकेश प्रकाश माने यांचे घर आहे. घरापुढे नेहमीप्रमाणे 2 दुचाकी पार्क केल्या होत्या. दुचाकींना आग लागून त्या जळाल्या आहेत.

बेळगाव - दुचाकी जळून खाक झाल्याची घटना आज (ता.24) पहाटे पावणे दोनच्या सुमारास घडली. दुचाकी अचानक पेट घेतली किंवा समाजकंटकांनी आग लावली, त्याची चौकशी सुरु आहे. मार्केट पोलिस घटनास्थळी दाखल होऊन माहिती घेतली आहे. 

समर्थनगरला राकेश प्रकाश माने यांचे घर आहे. घरापुढे नेहमीप्रमाणे 2 दुचाकी पार्क केल्या होत्या. दुचाकींना आग लागून त्या जळाल्या आहेत. एका दुचाकीची मुळ किंमत 67 हजार व दुसऱ्याची 52 हजार रुपये आहे. त्याशिवाय घरातील मीटर जळाले आहे. याची माहिती पोलिसांनी घेतली आहे. आज (ता. 24) पावणे 2 वाजण्याच्या सुमारास आग लागून दुचाकी पेटल्यानंतर राकेश माने व घरामधील अन्य सदस्य जागे झाले. आग आटोक्‍यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. घटनेनंतर परिसरामधील लोक चक्राविले आहेत. घटनास्थळी पेट्रोलची बॉटल, काडीपेटी दिसली आहे. त्यावरून समाजकंटकांनी आग लावली असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मार्केट पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. 
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Two wheelers were set on fire at samarth nagar belgaum