२८ कोटींचे कोकेन गिळलेल्या महिलांना अटक; पोटात होत्या १६१ कॅप्सूल

Two women arrested for swallowing cocaine worth Rs 28 crore in Delhi
Two women arrested for swallowing cocaine worth Rs 28 crore in DelhiTwo women arrested for swallowing cocaine worth Rs 28 crore in Delhi

नवी दिल्ली : युगांडा येथून आलेल्या दोन महिलांना दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक (women arrested) करण्यात आली आहे. दोन्ही महिलांनी कोकेनच्या १६१ कॅप्सूल गिळल्या होत्या. आरएमएल रुग्णालयात त्यांच्या पोटातून सर्व कॅप्सूल काढण्यात आले. या कोकेनची किंमत २८ कोटी आहे. त्यांचे वजन सुमारे २ किलो आहे. (Two women arrested for swallowing cocaine worth Rs 28 crore in Delhi)

युगांडाची एक महिला २२ मे रोजी दिल्ली विमानतळावर उतरली. तिला संशयास्पद स्थितीत पकडले (arrested) असता अंगात अमली पदार्थ लपवून ठेवल्याचे निष्पन्न झाले. महिलेला आरएमएल हॉस्पिटलमध्ये नेऊन एक्स-रे केला असता पोटात ८० कॅप्सूल असल्याचे आढळले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली कॅप्सूल बाहेर काढल्या असता त्यामध्ये कोकेन (cocaine) असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे एकूण वजन ९५७ ग्रॅम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत १४.३५ कोटी आहे, असे कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितले.

Two women arrested for swallowing cocaine worth Rs 28 crore in Delhi
जवानांना घेऊन जाणारी बस नदीत कोसळली; ७ जवान ठार

तसेच २६ मे रोजी युगांडातील आणखी एक महिला दिल्ली (Delhi) विमानतळावर ग्रीन चॅनल ओलांडत होती. तिला संशयाच्या आधारे पकडण्यात आले. महिलेने स्वतः सांगितले की, तिच्या पोटात कोकेनच्या ८१ कॅप्सूल आहेत. महिलेला आरएमएल हॉस्पिटलमध्येही नेण्यात आले. तिथे तिच्या पोटातून ८९१ ग्रॅम वजनाच्या ८१ कॅप्सूल बाहेर आल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकेनची (cocaine) किंमत सुमारे १३.६ कोटी रुपये आहे.

दिल्ली विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या आणखी एका कारवाईत ७६ लाखांहून अधिक किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी रियाधमधील भारतीय नागरिक आणि विमानतळ आरोग्य संस्थेच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १४ सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत. याचे वजन १६३२ ग्रॅम असल्याचे सांगितले जात आहे. त्याची किंमत ७६ लाखांपेक्षा जास्त आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com