'यूएई'ने मदत जाहीर केलेलीच नाही : स्वामी

यूएनआय
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली : केरळमधील पुरानंतर संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) जाहीर केलेल्या 700 कोटी रुपयांच्या मदतीवरून नाहक वाद निर्माण केल्याची टीका करीत भाजपने डावे नेते व त्यांच्या पाठिराख्यांना शुक्रवारी लक्ष्य करीत अशी मदत "यूएई'ने जाहीर केलेलीच नसल्याचे स्पष्टीकरण दिले. 

भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी व अमित मालवीय म्हणाले, की केरळातील शोध व बचावकार्य धीम्या गतीने सुरू असल्याची टीका काही जण मुद्दाम केंद्रावर करीत आहेत. केरळमधील पूरग्रस्तांसाठी संयुक्त अबर अमिरातीने 700 कोटी मदत कधीही जाहीर केलेली नाही, असे "यूएई'चे राजदूत अहमद अल्बना यांनी स्पष्ट केल्यानंतर हे प्रकरण त्यांच्यावरच शेकल्याचा दावा करीत स्वामी यांनी "भारतीय कम्यनिस्ट'वर निशाणा साधला.

ते म्हणाले, ""संयुक्त अरब अमिरातीने 700 कोटी रुपयांची मदत जाहीर केलेली नाही. तशी घोषणा अद्याप केलेली नाही. पूरग्रस्तांसाठी आवश्‍यक मदतीची मोजणी अद्याप सुरू आहे. यामुळे मदतीचा आकडा निश्‍चित झाला असेल, असे मला वाटत नाही,'' अशी माहिती "यूएई'च्या प्रतिनिधींनी एका इंग्रजी दैनिकाशी बोलताना दिल्याचे स्वामी म्हणाले. 

"यूएई'च्या अध्यक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कामाकाजाबाबतचे संबंध चांगले आहेत. हे संबंध बिघडविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी "यूएई'च्या 700 कोटींच्या मदतीबाबत माहिती दिल्यानंतर हा वाद सुरू झाला. या देशाकडून परकी मदत स्वीकारण्यासाठी पिनराई यांनी केंद्रावर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला आहे. 

- डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी, खासदार, भाजप 
 
Web Title: UAE has not helped says Swamy