UCC : समान नागरी कायद्याबाबत व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आणि कॉल्सच्या माध्यमातून होतेय दिशाभूल; विधि आयोगाचा इशारा

सध्या देशात समान नागरी कायद्यावरुन बराच गदारोळ सुरू आहे.
UCC Law Commission
UCC Law CommissioneSakal

सध्या देशात समान नागरी कायद्यावरुन बराच गदारोळ सुरू आहे. यूसीसीचे समर्थन आणि विरोध करणारे आपापली बाजू लावून धरत आहेत. पुढच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपचा मुख्य मुद्दा हा यूसीसी असू शकतो, असा अंदाजही वर्तवण्यात येत आहे. या दरम्यान विधि आयोगाने नागरिकांना खबरदारीचा इशारा दिला आहे.

सोशल मीडिया आणि व्हॉट्सअ‍ॅपवर UCC बाबत चुकीचे संदेश पसरवले जात आहेत. यासोबतच कित्येक नागरिकांना चुकीची माहिती देणारे फोन कॉल्सदेखील आले आहेत. त्यामुळे याबाबत खबरदारी घेण्याचा इशारा विधि आयोगाने दिला आहे.

UCC Law Commission
PM Modi on UCC : एका घरात दोन कायदे असतात का? समान नागरी कायद्यासाठी मोदींनी दिले बांगलादेशचे उदाहरण

विधि आयोगाकडून स्पष्टीकरण

कित्येक ठिकाणी काही फोन नंबर शेअर केले जात आहेत. हे फोन नंबर विधि आयोगाचे असल्याचं म्हणण्यात येत आहे. तसेच, विधि आयोगाच्या नावाने कित्येक फेक संदेश पसवण्यात येत आहेत. मात्र, विधि आयोगाचा या दिशाभूल करणाऱ्या मेसेज आणि फोन नंबरशी काहीही संबंध नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

विधि आयोग केवळ आपली अधिकृत वेबसाईट आणि प्रेस रिलीज या माध्यमातून; किंवा अधिकृत वृत्तसंस्थांच्या माध्यमातूनच आपल्या सूचना प्रसारित करते असंही आयोगाने स्पष्ट केलं.

UCC Law Commission
Uniform Civil Code: समान नागरी कायद्याचा ख्रिस्ती धर्मावर काय परिणाम होईल?

यूसीसी बाबत मागितल्या सूचना

विधि आयोगाने समान नागरी कायद्याबद्दल नागरिकांकडून प्रतिक्रिया आणि सूचना मागवल्या आहेत. आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन लोक आपले विचार मांडू शकतात. १४ जूनपर्यंत याठिकाणी १९ लाख प्रतिक्रिया नोंदवण्यात आल्या होत्या. १३ जुलैपर्यंत लोक आपली प्रतिक्रिया याठिकाणी देऊ शकतात.

UCC Law Commission
Uniform Civil Code: समान नागरी कायदा बनवण्यासाठी मोदींचे मोठे पाऊल, या ४ मंत्र्यांची समिती स्थापन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com