पोल्ट्री फार्मला भीषण आग; 5000 कोंबड्या जळून खाक

Ranawat Poultry Farm
Ranawat Poultry Farmesakal
Summary

ही घटना उदयपूरच्या गुडली परिसरात घडलीय.

उदयपूर (Rajasthan) : उदयपुरात मंगळवारी रात्री आगीनं चांगलाच तांडव केला. येथील एका पोल्ट्री फार्मला (Poultry Farm) रात्री उशिरा भीषण आग लागली, त्यामुळं पोल्ट्री फार्ममध्ये ठेवलेल्या 5 हजार कोंबड्या जिवंत जळून मरण पावल्या आहेत. या धक्कादायक घटनेनंतर, अग्निशमन दलानं बरेच प्रयत्न करून आग आटोक्यात आणलीय. मात्र, तोपर्यंत पोल्ट्री फार्ममधील सर्व काही जळून राख झाली होती. आगीत पोल्ट्री फार्मचं मोठं नुकसान झालंय.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ही घटना उदयपूरच्या (Udaipur) गुडली परिसरात घडलीय. राणावत पोल्ट्री फार्म (Ranawat Poultry Farm) असं याचं नाव असून यामध्ये 15 वेगवेगळे विभाग करून सुमारे 5000 कोंबड्या ठेवण्यात आल्या होत्या. मंगळवारी रात्री उशिरा अचानक शॉर्टसर्किट झाल्यानं पोल्ट्री फार्मला आग लागली. आगीनं भीषण रूप धारण केलं आणि संपूर्ण पोल्ट्री फार्म जळून खाक झाला. प्राथमिक माहितीनुसार, पोल्ट्री फार्ममध्ये ठेवलेल्या 5000 कोंबड्यांची जळून राख झाली असून, अनेक प्रकारचं नुकसानही झालंय.

Ranawat Poultry Farm
गायींच्या रक्षणासाठी घरात तलवारी ठेवा, साध्वींचं वादग्रस्त विधान

अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) जवानांनी अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणलीय. पोल्ट्री फार्मचे मालक विक्रम सिंह यांना रात्री उशिरा आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी अग्निशमन दलाला फोन केला. अग्निशमन दलानं रात्री आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत संपूर्ण पोल्ट्री फार्म जळून खाक झालं होतं. शॉर्ट सर्किटमुळं आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, शॉर्टसर्किट कसे झाले याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

Ranawat Poultry Farm
विधानपरिषदेच्या सहापैकी चार जागांवर भाजप; 'महाविकास'ला धक्का

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com