खुद्द उदयनराजेंनाच 'शिवस्वराज्य यात्रे'ची कल्पना नाही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठी गळती लागली असताना जनाधार टिकवण्याचे मोठे आव्हान आहे. यापार्श्वभुमीवर राष्ट्रवादीने 'जुन्नर ते सिंदखेडराजा' अशी शिवस्वराज्य यात्रा जाहीर केली आहे. या यात्रेची धुरा शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे, तर 'स्टार कँम्पेनर' म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. 

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठी गळती लागली असताना जनाधार टिकवण्याचे मोठे आव्हान आहे. यापार्श्वभुमीवर राष्ट्रवादीने 'जुन्नर ते सिंदखेडराजा' अशी शिवस्वराज्य यात्रा जाहीर केली आहे. या यात्रेची धुरा शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे, तर 'स्टार कँम्पेनर' म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. 

कालपासून या यात्रेच्या बातम्या वृत्तवाहिन्यांवर झळकत आहेत. मात्र या यात्रेसंबंधी स्वत: उदयनराजेच अनभिज्ञ असल्याची माहिती पुढे आली आहे. मुळात अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली उदयनराजे स्टार कँम्पेनर म्हणून कां जातील, असा त्यांच्या निकटवर्तियांचा सवाल आहे.  

उदयनराजेंचे वलय वादातीत आहे. शिवछत्रपतींचे थेट वंशज म्हणून त्यांच्याविषयी सर्वत्र आदराची भावना आहे. त्यांच्या स्टाईलचे लाखो युवकांवर गारूड आहे. असे असताना उदयनराजे यात्रा काढायची असेल तर स्वत: काढतील, ते अन्य यात्रेत कँम्पेनर म्हणून कां जातील, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. महत्वाची बाब म्हणजे अशी यात्रा काढायची आहे आणि त्याचे कँम्पेन त्यांना करायचे आहे, असेही राष्ट्रवादीतील कुणी उदयनराजेंना सांगितलेले नाही.

नुकत्याच झालेल्या पक्षांतरामुळे आणि आणखीन गळतीच्या बातम्यांमुळे राष्ट्रवादी पक्ष हडबडून गेला आहे. त्यातच घाईघाईत या यात्रेची घोषणा करण्यात आली आहे. तसेच उदयनराजेंना विश्वासात न घेताच त्यांच्या नावाने यात्रेचे मार्केटिंग सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udayan Raje has no any idea about NCPs ​​'Shivsvarajya Yatra'