
आज के शिवाजी - नरेंद्र मोदी या पुस्तकाविषयी सध्या सर्वत्र वादंग निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केल्याने हा वादंग निर्माण झाला आहे. यावर भाजपचे नेते आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले आणि माजी खासदार उदयनराजे भाेसले यांनी आपली भुमिका स्पष्ट केली आहे.
सातारा : आज के शिवाजी - नरेंद्र मोदी हे पुस्तक तातडीने थांबवावे अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे. आज (सोमवार) सुरुची बंगला येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी अति उत्साही कार्यकर्त्यांमुळे हा प्रकार घडल्याची तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - माेदींच्या पुस्तकाविषयी शिवेंद्रसिंहराजे म्हणाले...
दरम्यान माजी खासदर उदयनराजे भाेसले यांनी त्यांची भुमिका स्पष्ट केली. त्यांनी पुस्तकाबाबत सविस्तर माहिती घेईन. त्यानंतर बाेलेन असे नमूद केले आहे.
जरुर वाचा - उद्धवजी, राऊताच्या जिभेला लगाम घाला; संभाजीराजेंकडून अरेतुरेची भाषा
'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकावर उदयनराजेंचं मौन
LINK :: https://t.co/DEs2SrqHpt@Chh_Udayanraje @BJP4Maharashtra pic.twitter.com/eeZnSqnBpz— SaamTV News (@saamTVnews) January 13, 2020