माेदींच्या पुस्तकाविषयी शिवेंद्रसिंहराजे बाेलले आता उदयनराजेंकडे लक्ष

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

आज (साेमवार) सकाळच्या प्रहरी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना माध्यमांनी गाठून त्यांची पुस्तकाबाबतची भुमिका जाणून घेतली. त्यावेळी आमदार भाेसले म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केल्याने पक्षश्रेष्ठींनी अतिउत्साही कार्यकर्त्यांच्या कृतीवर तातडीने आळा घालावा अशी मागणी केली.

सातारा : आज के शिवाजी - नरेंद्र मोदी हे पुस्तक तातडीने थांबवावे अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे. आज (सोमवार) सुरुची बंगला येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी अति उत्साही कार्यकर्त्यांमुळे हा प्रकार घडल्याची तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - भाजप नेते श्याम जाजू म्हणतात, शिवाजी महाराजांमध्ये असणारे गुण मोदींमध्ये...

छत्रपती शिवरायांबरोबर भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुन्हा तुलना झाल्याने शिवप्रेमींमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. दिल्लीत झालेल्या संत संमेलनात 'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' नावाच्या पुस्तिकेचे प्रकाशन दिल्ली भाजपच्या नेत्यांच्या उपस्थितीत नुकतेच करण्यात आले.
पूर्वाश्रमीचे कट्टर शिवसैनिक व सध्या भाजपवासी झालेले जयभगवान गोयल यांनी हे लिहिले आहे. 

नक्की वाचा - उद्धवजी, राऊताच्या जिभेला लगाम घाला; संभाजीराजेंकडून अरेतुरेची भाषा

आज (साेमवार) सकाळच्या प्रहरी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना माध्यमांनी गाठून त्यांची पुस्तकाबाबतची भुमिका जाणून घेतली. त्यावेळी आमदार भाेसले म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केल्याने पक्षश्रेष्ठींनी अतिउत्साही कार्यकर्त्यांच्या कृतीवर तातडीने आळा घालावा. या तुलनेमुळे बराच वादंग सगळीकडे महाराष्ट्रात आणि देशभर होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज तसेच जे कोणी स्वातंत्र्यसेनानी असतील त्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पंतप्रधान म्हणून त्यांनी स्वतःची देशात आणि जगात भारताची वेगळी ओळख निर्माण केली आहे. काही अति उत्साही कार्यकर्ते असतात. पक्षश्रेष्ठींनी अशा अति उत्साही कार्यकर्त्यांना चाप बसवावा अथवा त्यांना समज दिली पाहिजे.

जरुर वाचा - शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजप नेत्यांनी भूमिका घ्यावी : संजय राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःहून काय सांगितले नसेल माझी तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करा असेही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नमूद केले.

ते म्हणाले ते देशाचे नेते आहेत. त्यांना लोकांच्या भावना, मराठी माणसांच्या भावना माहित आहेत. संबंधित पुस्तक आल्याने टीका टिप्पणी होत आहे. आज विरोधकांनी टीका करण्याची संधी मिळाली आहे. पक्षश्रेष्ठी अमित शहा यांनी लक्ष घालून ज्या गोष्टी सुरु आहेत. त्या तातडीने थांबवाव्यात. ते पुस्तक थांबवावे. भविष्यात अशा प्रकारच्या गोष्टी घडू नयेत यासाठी तातडीने पावले उचलावीत असेही आमदार भोसले यांनी नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivendrasinhraje Asked To Stop Aaj Ke Shivaji Narendra Book