राम मंदिरासाठी 1992ची पुनरावृत्ती करू : उद्धव ठाकरे

राम मंदिरासाठी 1992ची पुनरावृत्ती करू : उद्धव ठाकरे

अयोध्या: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेनेच्या सर्व खासदारांसह अयोध्येत दाखल झाले असून, राम मंदिर बनविण्यासाठी वाटेल ते करायला तयार असल्याचे यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 1992 च्या पुनरावृत्ती करण्याची वेळ आल्यास तशीही तयारी असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

राम मंदिरासाठी केंद्र सरकारने अध्यादेश काढावा हीच आमची इच्छा आहे. कायदा करून मंदिर उभारण्यात यावे हीच आमची कायम भूमिका राहील असेही ठाकरे यांनी सांगितले. 

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सकाळी फैजाबादमध्ये दाखल झाले. उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब नवनिर्वाचित खासदारांसह रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. या वेळी उद्धव यांच्यासोबत शिवसेनेचे 18 खासदारही उपस्थित होते. या सर्वांनी रामजन्मभूमिस्थळी जाऊन दर्शन घेतले. त्याच वेळी म्हणजेच आज सकाळी 11 वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी झाला. त्यामुळे उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला गैरहजर होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com