

Shivsena Supreme Court Hearing
ESakal
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मतभेदाच्या नावाखाली राजकीय निष्टा बदलणे जर कायदेशीर मानले गेले तर मोजक्या आमदारांच्या बंडाळीद्वारे सरकारे अस्थिर केली जाऊ शकतील, असा युक्तिवाद शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे ॲड. कपिल सिब्बल यांनी आज सर्वोच्च न्यायालयात केला. बहुमताच्या आधारे शिंदे गट हीच खरा शिवसेना असल्याचा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय सुभाष देसाई प्रकरणातील घटनापीठाच्या निकालाच्या विरोधात असल्याचेही सिब्बल यांनी रिजॉंईंडर दाखल करताना सांगितले.