Uddhav Thackeray Targets BJP
sakal
नवी दिल्ली : ‘‘केंद्रातील विद्यमान सत्ताधाऱ्यांपेक्षा इंग्रज चांगले होते, असे म्हणण्याची वेळ आली आहे. सरकारची आंदोलकांशी वागणूक पाहता, हे लोकशाहीचे लक्षण दिसत नाही. सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात हवा गेली असून ही हवा काढण्यासाठी जनता वेळ लावणार नाही,’’ या शब्दांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली.