धक्कादायक! देशातील 23 विद्यापीठे बेकायदा

वृत्तसंस्था
बुधवार, 24 जुलै 2019

देशातील 23 बेकायदा विद्यापीठांची नावे विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) मंगळवारी जाहीर केली. त्यातील आठ विद्यापीठे उत्तर प्रदेशमधील आहेत. अशा शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेऊ नये, असा इशारा उच्च शिक्षण नियामक संस्थेने विद्यार्थ्यांना दिला आहे. 

नवी दिल्ली ः देशातील 23 बेकायदा विद्यापीठांची नावे विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) मंगळवारी जाहीर केली. त्यातील आठ विद्यापीठे उत्तर प्रदेशमधील आहेत. अशा शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेऊ नये, असा इशारा उच्च शिक्षण नियामक संस्थेने विद्यार्थ्यांना दिला आहे. 

"देशातील विविध भागांत यूजीसी कायद्याचे पालन न करणारी 23 बेकायदा विद्यापीठे सध्या सुरू असल्याची माहिती विद्यार्थी आणि जनतेला देण्यात आली आहे,'' असे "यूजीसी'चे सचिव रजनीश जैन यांनी सांगितले. यापैकी आठ विद्यापीठे उत्तर प्रदेशमधील असून, दिल्लीतील सात आहेत. पश्‍चिम बंगाल आणि ओडिशातील प्रत्येकी दोन विद्यापीठे बेकायदा आहेत. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि पुद्दुचेरीत प्रत्येकी एक बनावट विद्यापीठ आहे. 

बनावट विद्यापीठांची संख्या 
23 एकूण 

8 उत्तर प्रदेश 

7 दिल्ली 

2 पश्‍चिम बंगाल 

2 ओडिशा 

1 केरळ 

1 कर्नाटक 

1 महाराष्ट्र 

1 पुद्दुचेरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: UGC release 23 fake university in India