गांधी अडनावाशिवाय तुमच्याकडे काय? राहुल गांधी म्हणाले...

वृत्तसंस्था
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

माझ्या क्षमतेबद्दल न बोलता फक्त माझ्या कुटुंबाबद्दलच तुम्ही मत बनविले असेल तर मी काही करू शकत नाही. तुमचे इच्छाच ती आहे. आपल्या आवडीवर हे अवलंबून आहे, माझ्यावर नाही. माझ्या वडिलांनंतर माझे कुटुंब सत्तेत राहिलेले नाही. मुद्दाम हे विसरले जाते.

लंडन : ब्रिटन दौऱ्यावर असलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्रकारांनी गांधी अडनावाशिवाय आपल्याकडे काय आहे, असे विचारले असता त्यांनी उत्तर देताना म्हटले की कोणत्याही व्यक्तीला ऐकल्याशिवाय निष्कर्षापर्यंत पोचले नाही पाहिजे. कुटुंब किंवा अडनावाकडे पाहून नाहीतर त्याच्यामध्ये असलेल्या गुणांच्या आधारे त्या व्यक्तीबद्दल मत बनविले पाहिजे असे सुनाविले.

गेल्या काही दिवसांपासून परदेश दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी सतत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष्य केले आहे. राहुल गांधी यांना सतत गांधी कुटुंबात जन्म घेतल्याबद्दल टीकेला सामोरे जावे लागते. ब्रिटनमध्येही त्यांना याच प्रश्नाला सामोरे जावे लागले. 

राहुल गांधी म्हणाले, की माझ्या क्षमतेबद्दल न बोलता फक्त माझ्या कुटुंबाबद्दलच तुम्ही मत बनविले असेल तर मी काही करू शकत नाही. तुमचे इच्छाच ती आहे. आपल्या आवडीवर हे अवलंबून आहे, माझ्यावर नाही. माझ्या वडिलांनंतर माझे कुटुंब सत्तेत राहिलेले नाही. मुद्दाम हे विसरले जाते. दुसरी गोष्ट जरी मी गांधी कुटुंबात जन्मलो असलो तरी मी जे काही बोलत आहे ते ऐका. परराष्ट्र निती, अर्थशास्त्र, भारताचा विकास, कृषी क्षेत्र यासह काही मुद्द्यांवर माझ्याशी खुली चर्चा करा. मला कोणताही प्रश्न विचारा त्यानंतर निष्कर्ष काढा.

Web Title: UK journalist asked Rahul Gandhi what do you have besides the name