Rishi Sunak: 'आमचे दाजी ब्रिटनचे पंतप्रधान झाले', मनपूर्वक शुभेच्छा!

सुनक यांचे नाव पंतप्रधानपदी निश्चित झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांच्यावर सोशल मीडियावरुन शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला.
Rishi Sunak mims viral
Rishi Sunak mims viralesakal

UK PM Rishi Sunak Viral Mims: देशभरात दिवाळीचा माहौल आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या भारत पाकिस्तान सामन्यात भारतानं पाकिस्तानचा पराभव करुन चाहत्यांना गोड बातमी दिली. साऱ्या साऱ्या देशात आनंदाचे वातावरण होते. दुसरीकडे आणखी एका बातमीनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ते म्हणजे भारतीय वंशाचा व्यक्ती ब्रिटनचा पंतप्रधान झाला आहे. त्यांचे नाव ऋषी सुनक असे आहे.

सुनक यांचे नाव पंतप्रधानपदी निश्चित झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांच्यावर सोशल मीडियावरुन शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला. वेगवेगळ्या मीम्समधून सुनक यांचं कौतूक होताना दिसत आहे. यासगळ्यात मीम्सकऱ्यांनी केलेले भन्नाट मीम्स देखील लक्ष वेधून घेताना दिसताहेत. असंच एक लक्षवेधी मीम्स म्हणजे, आमचे दाजी ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाले त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन....शुभेच्छुक समस्त कर्मचारी वर्ग मौजे हिंजवडी फेज १,२. त्याचं झालं असं की, 2009 मध्ये सूनक यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची भारतीय कंपनी इन्फोसिसचे मालक नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्ती यांच्याशी लग्न केलं.

नेटकऱ्यांनी सुनक यांचे असे कनेक्शन लावत मीम्स तयार करुन सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतले आहे. याशिवाय आणखी काही मीम्स आहेत त्यामध्ये नेटकऱ्यांनी आपली सर्जनशीलता, कल्पकता दाखवत भन्नाट मीम्स समोर आणले आहेत. त्यात वानगीदाखल काही मीम्सचा उल्लेख करायचा झाल्यास, आता बघाच मी ब्रिटनला अखंड भारतात आणून दाखवणार, आता इंग्लंडचे मार्केट आपले आहे (यात इन्फोसीसचे संस्थापक, अध्यक्ष नारायण मुर्ती यांचा फोटो आहे.)

Rishi Sunak
Rishi Sunak
Rishi Sunak mims viral
Viral Video : मोरासारखे रंगीबेरंगी पंख पसरून नाचताना दिसला कोळी
Rishi Sunak
Rishi Sunak

सोशल मीडियावर वेगवेगळ्या ढंगातील, रंगातील अशा निराळ्या आशयाच्या मीम्सनं धमाल उडवून दिली आहे. भारतीय वंशाचे ब्रिटनचे खासदार ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे. माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी काल पंतप्रधानपदाच्या रेसमधून माघार घेतल्यानंतर ऋषी सुनक यांचं नाव आघाडीवर होतं. ऋषी सुनक हे ब्रिटनचे अर्थमंत्री राहिलेले आहेत. टोरी खासदार असलेल्या 42 वर्षीय ऋषी सूनक यांचा जन्म यूकेच्या साउथॅम्प्टनमध्ये भारतीय वंशाच्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील नॅशनल हेल्थ सर्व्हिसचे (NHS) जनरल प्रॅक्टिशनर होते आणि आई स्थानिक फार्मसी चालवत होत्या. त्यांच्या आजी-आजोबांचा जन्म पंजाबमध्ये झाला होता.

Rishi Sunak
Rishi Sunak
Rishi Sunak mims viral
Virat Kohli: IAS अधिकारी म्हणतो, कोहलीनं ५ गोष्टी शिकवल्या!
Rishi Sunak
Rishi Sunak

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com