युक्रेनमध्ये तिरंगा बनला भारतीयांची ढाल; रशियन सैनिकांनीही केला सन्मान

Tricolor Help Indian Student  Reach Safe From Ukraine
Tricolor Help Indian Student Reach Safe From Ukrainee sakal

युक्रेन-रशियामध्ये सध्या युद्ध (Ukraine Russia War) सुरू आहे. त्यामुळे युक्रेनमधील स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत भारतीय विद्यार्थी अडकलेले (Indian Student Stranded Ukraine) आहेत. सध्या त्यांना भारतात आणण्याचे काम सुरू आहे. विद्यार्थ्यांना दुसऱ्या देशाच्या सीमेपर्यंत नेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर भारताचा तिंरगा लावण्यात आला आहे. रशियन सैनिक देखील तिरंग्याचा सन्मान करत असून वाहनांना रवाना करत आहेत.

Tricolor Help Indian Student  Reach Safe From Ukraine
Russia Ukraine War : कोल्हापूरच्या त्या दोघी युक्रेनमधून मुंबईत पोहोचल्या

युद्धादरम्यान युक्रेनमधील रशियन सैनिक भारतीय विद्यार्थी असलेल्या वाहनांना देशाच्या सीमेपर्यंत सुरक्षित पोहोचण्यास मदत करत आहेत. कारण, या वाहनांवर भारताचा तिंरगा लावण्यात आला आहे. त्यामुळे या सैनिकांकडून सन्मान केला जात असल्याचे युक्रेनवरून परतलेल्या एका विद्यार्थ्याानं सांगितलं.

रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत चर्चा करून युक्रेनमधील भारतीयांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यासाठी मदत करण्याचं आश्वास पुतीन यांनी दिलं होतं. भारतीय विद्यार्थ्यांच्या वाहनांवर तिरंगा लावलेला असेल तर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे. त्यांना देशाच्या सीमेवर पोहोचण्याचे काम रशियन सैनिक करतील, असं पुतीन म्हणाल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर भारतीयांना सुरक्षितपणे सीमेवर पोहोचवले जात आहे, असं सांगत बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार सुशील कुमार यांनी मोदींचे आभार मानले. तसेच मोदींमुळे फक्त भारतीय विद्यार्थी सुरक्षित पोहोचू शकले, असा दावाही त्यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com